खेड (प्रतिनिधी)कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या ५ रेल्वे गाड्या गुरुवारी विलंबाने धावल्या. नागपूर-मडगाव स्पेशलसह सीएसएमटी-करमाळी उन्हाळी स्पेशल २ तास उशिराने मार्गस्थ झाल्या.
उधना-मंगळूर स्पेशल १ तास २० मिनिटे तर सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस १ तास विलंबाने धावली. एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस १ तास १० मिनिटे विलंबाने धावली. हा अपवाद वगळता उर्वरित सर्व रेल्वे गाड्या नियोजन वेळेत मार्गस्थ झाल्या. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.












