लोटे औद्योगिक वसाहतीतील पाण्याच्या गळतीबाबत दुर्लक्ष

खेड(प्रतिनिधी)एकीकडे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे तर खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली असून ही गळती आहे की मानवनिर्मित गळती आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथे पाणी वाया जात आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीमधील पुष्कर कंपनीच्या समोरील असणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास म हामंडळांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आहे. या ठिकाणी येथील ट्रक ड्रायव्हर बिनधास्तपणे अंघोळ करत आहेत, तर सदरची गळती दिसू नये म्हणून त्यावरती प्लास्टिकच्या पिशवीने झाकलेले आहे, हे कोणी केली आहे? याचा उलगडा होत नाही, मात्र या औद्योगिक वसाहतीप्त फेऱ्या मारणारे एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचारी यांना ही गळती कशी दिसली नाही? असा प्रश्न पंडला आहे. अशाच प्रकारे लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागली आहे. ही गळती नेमकी कशाने लागली आहे की मानवनिर्मित गळती आहे? हे पाहणी करून सदरची पाणी गळती रोखण्यास प्रयत्न केले पाहिजेत. एकीकडे पाण्याचा अपव्यय टाळा, मात्र दुसरीकडे पाणी गळती रोखण्यात अपयश याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.