खेड(प्रतिनिधी)खेड मध्ये पावसाचा कहर सुरूच जगबुडी नदी वाहतेय इशारा पातळी ओलांडून
मंगळवारी रात्री पासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा कहर बुधवारी ही कायम असून भरणे नाका येथील जगबुडी नदीने सध्या ५ मीटर असलेली इशारा पातळी ओलांडून वाहत असल्याने येथील प्रशासन सतर्क झाले आहे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
सकाळ पासून सुरु असलेल्या पावसाचा जोर कायम असून जन जीवन अंशतः विस्कळीत झाले आहे












