स्पर्धेचे सुंदर आयोजन केल्या बद्दल युवासेनेचे केले कौतुक

वेंगुर्ले l दाजी नाईक :युवासेनेच्या वतीने वेंगुर्ला तालुका मर्यादित सुरू असलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आमदार निलेश राणे यांनी भेट दिली. युवा खेळाडूंना एकत्र आणून चांगल्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले त्या बद्दल युवासेनेचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आम. निलेश राणे यांनी मैदानात उतरून खेळाडूंना प्रोत्साहन दिल आणि क्रिकेटचाही आनंद लुटला.
युवा सेने तर्फे वेंगुरी कॅम्प मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आम. निलेश राणे यांचे स्पर्धेच्या स्थळी आगमन होताच युवासेना पदाधिरी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व खेळाडू व क्रिकेट प्रेमींना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख श्री. हर्षद डेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रितेश राऊळ, श्री. भूषण सारंग, श्री. तुषार साळगावकर, श्री. श्याम कोलगेकर, शिवसेना शहरप्रमुख श्री. उमेश येरम, श्री. श्रद्धा बाविसकर, श्री. दीपेश परब आदी शिवसेना- युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.












