राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव भाजपा साजरा होणार : जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई 

वेंगुर्ले l प्रतिनिधी :राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव संपुर्ण महाराष्ट्रात २१ मे ते ३१ मे या कालावधीत साजरा केला जाणार आहे . या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात भाजपा सिंधुदुर्ग ची “जिल्हा कार्यशाळा” बुधवार दिनांक २१ मे रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. अशी माहिती जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी दिली.

वसंत स्मृती सभागृहात महीला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा व ठाणे- कोकण विभागाच्या अभियानाच्या प्रमुख प्रा.वर्षा भोसले – माने यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा संपंन्न होणार आहे. या कार्यशाळेसाठी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारणी सदस्य , मोर्चा / आघाडी प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारणी सदस्य , जिल्हा पदाधिकारी , जिल्हा व मंडल समिती ( राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंती समारोह ) , जिल्हा मोर्चा अध्यक्ष व सरचिटनीस , आघाडी / प्रकोष्ठ जिल्हा संयोजक , मंडल अध्यक्ष ( आजी / माजी ) , सर्व लोकप्रतिनिधी अपेक्षीत आहेत . तरी सर्व अपेक्षीतांनी उपस्थित रहाणे अनिवार्य आहे. सिंथुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उस्तव विवीध उपक्रम आयोजीत करुन साजरा करणार असे या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगीतले.