वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी तालुका कृषी कार्यालयअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) समिती वैभववाडीच्या अध्यक्षपदी शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी मंगेश परशुराम कदम यांची निवड करण्यात आली आहे. कदम यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
आत्मा समितीच्या सदस्यपदी पुंडलिक साळुंखे, सुरज तावडे, उत्तम सुतार, महेश संसारे, सुहास सावंत, सुरज तावडे, अनुजा अंगावलकर, अभिजित पवार, मनोहर फोडके, महेश गोखले, अक्षता डाफळे, राजेंद्र मोरे, प्रदीप तावडे, दर्पना बोबकर, साक्षी भुतारणे, समाधान गुरव, संतोष हरयाण, रत्नाकर बंदरकर यांची निवड करण्यात आली आहे.
या सभेला तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, आत्मा सचिव राकेश हुले आदी उपस्थित होते.
मंगेश कदम खांबाळे गावचे सुपुत्र असून महाराष्ट्र शासनाचा कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाजी पाला, कलिंगड, भुईमूग, हळद, चार सूत्री भात लागवड, ग्रीन हाऊस मध्ये भाजी पाला लागवड करीत तरुणांना शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.











