राज्यसरचिटणीस सतीश मिटकरी
विजयदुर्ग (प्रतिनिधी) : संघटनेचे काम प्रामाणिकपणे करत असतानाही गद्दार ठरवून भाजप प्रणित एसटी संघटनेला काहींनी विरोध केला……. विलीनीकरण आणि सातवा आयोग यामध्ये गल्लत करून विरोधाभास निर्माण केला. मात्र तरीही एसटी कामगारांनी विश्वास ठेवून सेवा संघर्ष समिती संघटनेच्या रोपट्याचा वटवृक्ष केला हे सर्व श्रेय कामगारांचे असल्याचे मत सेवा शक्ती संघर्ष युनियनचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सतीश मिटकरी यांनी विजयदुर्गमध्ये व्यक्त केले. या युनियनच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी विजयदुर्ग आगारामध्ये स्थानिक संघटनेच्या पदाधिकांची भेट घेतली. यावेळी राज्य कोषाध्यक्ष रामभाऊ मुंढे, सांगली विभागीय सचिव महेश पाटील, कोल्हापूर विभागीय सचिव संदीप कांबळे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विनोद पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक राणे, सिंधुदुर्ग जिल्हा सचिव भरत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी युनियनच्या विजयदुर्ग आगार संघटनेने मिटकरी तसेच राज्य विभागीय पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी विजयदुर्ग आगाराचे सेवा शक्ती संघर्ष युनियन अध्यक्ष प्रदीप मिठबावकर, विजयदुर्ग सरपंच रियाज काजी, माजी सरपंच ग्रेसीस फर्नांडीस, अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष समितीच्या संघर्षाचा संपूर्ण आढावा सतीश मिटकरी यांनी घेतला. दरम्यान, विजयदुर्ग आगार व्यवस्थापक यांची महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन येथील महत्त्वपूर्ण प्रश्नावर चर्चा केली आणि कामगारांच्या मूलभूत प्रश्नांवर काही सूचनाही करण्यात आल्या.












