खेड | देवेंद्र जाधव : मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित असलेल्या जगबुडी पुलावर तीव्र उतार असलेल्या ब्लाइंड स्पॉटवर सोमवारी पहाटे झालेल्या अपघातामध्ये या ‘ब्लाइंड्स स्पॉट’ ने तब्बल पाच जणांचा पाच जणांचा नाहक बळी घेतला आहे याला केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याची बाब या निमित्ताने अधोरेखित झाली आहे

महामार्गा वरील नवा जगबुडी पूल अपघाचे केंद्र बिंदू ठरत असून तीव्र उतार अन लागलीच वळण असल्याने वाहन चालकांना या वळणाचा अंदाज येत नाही त्यात पुलावरून जाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकळी जागा असल्याने वाहने थेट नदी पात्रात कोसळून अपघात होत आहेत या ठिकाणी कोणतीच उपाय योजना नसल्याने अपघाताचे सत्र या पुलावर कायम कायम आहे याचाच प्रत्यय मुंबईहून देवरूखच्या दिशेने जाणारी किया कार तब्बल १०० फूट नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातातून ही बाब स्पष्ट झाली आहे
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा तीव्र उतार आणि लागलीच वळण असल्याने या ठिकाणी वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होत असल्याची बाब यापूर्वी झालेल्या अपघातातून निदर्शनास आले आहे असे असताना प्रशासनाकडून अद्यापि कोणतीच उपाययोजना न करण्यात आल्याने सोमवारी झालेल्या अपघातात गेलेले पाच बळी हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच गेले असल्याचा आरोप होत आहे दोन जोड पुलांच्या मध्ये असलेली मोकळी जागा हीच आता अपघाताला कारणीभूत ठरत आहे यापूर्वी या पुलावर अनेक मोठमोठे अपघात झाले आहेत वाहने नदीखाली कोसळले देखील मात्र सोमवारी कार उलटून झालेली घटना ही दुर्दैवी आहे
तीव्र वळणाचा पूल ही बाब तशी नव्यानेच कोकणात उदयास आली आहे जगबुडी पूल वळणा वळणाचा बनवला गेल्याने हा पूल वाहतुकी साठी धोकादायक असल्याने या ठिकाणाला ब्लाइंड स्पॉट जाहीर करण्यात आले आहे मात्र त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असताना प्रशासन मात्र आणखी किती बळी घेनार हा प्रश्न विचारला जात आहे या ठिकाणी अनेक अपघात होऊन त्यामध्ये अनेक जण जायबंदी तर अनेक जणांचा जीवन प्रवास थांबला आहे असे असताना या पुलावर उपाययोजना करण्याची दखल च घेतलेली नाही दोन पुलांच्या मध्य भागी असलेली धोकादायक जागा लोखंडी जाळीने झाकली जाण्याची मागणी होत असताना त्या कडे पूर्णता डोळे झाक केली गेल्याने ५ बळी गेले असल्याचा आता आरोप होऊ लागला आहे अजून किती बळी गेल्या नंतर प्रशासनाला जाग येणार हाच प्रश्न आहे
कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न
या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी हे वाहन खाली गेले त्या ठिकाणी लोखंडी जाळी किंवा संरक्षण भिंत बांधून हे अपघात थांबणार नाहीत अपघात होतच राहतील त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी आमचं प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रोड सेफ्टी सल्लागार यांच्याशी चर्चा करून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे अशी माहिती दिली.











