BREAKING: दुपारी 3.30 वाजता कार्यालय बॉम्बने उडवून देणार 

पालघर जिल्हाधिकारी कार्यालय संबंधी आला मेल 

संपूर्ण कार्यालय रिकामे करून चोख बंदोबस्तात तपास सुरू 

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याचा मेल पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळाला असून एकच खळबळ उडाली आहे. पालघर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतला असून कसून तपासणी सुरू आहे. त्यामुळे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालय खाली करण्याच्या सूचना पोलिसांनी दिले आहेत.

 

दरम्यान अनोळखी ईमेल आयडी वरून बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता .सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील सर्व कार्यालय खाली करण्यात आली आहेत.

सदर ई-मेल पोलिसाकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी या बाबीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयासह, प्रशासकीय इमारत अ आणि ब तात्काळ खाली करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांना अनोळखी वस्तू आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क करावा .

कोणीही अफवा पसरू नये आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवून नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले