कुडासे येथील संशयास्पद दफन प्रकरणाला पूर्णविराम

खड्ड्यात आढळला मृत कुत्रा

दोडामार्ग l प्रतिनिधी :दोडामार्ग – तिलारी मार्गावर कुडासे तिठा नजिक असलेल्या साईडपट्टीवर खोदलेल्या खड्ड्यात पाळीव कुत्रा दफन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सदर कुत्रा दफन केल्यानंतर त्यावर फुलांची मोठी रास आणि त्यावर दगड ठेवल्याने तालुक्यात विविध चर्चाना उत आला होता.

 

भेडशी येथील सजग युवकांमुळे हा प्रकार काल रात्रीच उघड झाला होता. आज दुपारी दफन केलेली जागा पुन्हा उरकण्यात आल्यानंतर त्यामध्ये मृत पाळीव कुत्रा दफन केल्याचे उघड झाले.