तळेरे: गुरुप्रसाद सावंत : ‘ऑपरेशन सिंदूरच्या’ विजयाच्या पार्श्वभूमीवर व भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी तळेरे येथे भारतीय लष्कराचा विजय असो…जय जवान,जय किसान अशा घोषणा देत तळेरे बसस्थानक ते बाजारपेठ मार्गे तळेरे बसस्थानक अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. आज आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहतो,सुखाने झोपू शकतो ते केवळ त्या जवानांमुळे कारण जवान सीमेवर लढतात आणि तळहातावर शिर घेऊन बलिदान द्यायला तयार असतात यामुळेच आपण सुरक्षित आहोत. तरी त्याना सलाम करण्यासाठी व ऑपरेशन सिंदूरच्या विजय साजरा करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे असे डाॅ. मिलिंद कुलकर्णी यानी रॅलीला संबोधित करताना सांगितले.
यावेळी रॅलीचे नेतृत्व करणारे भाजपा मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर,माजी जि.प.सदस्य संजय देसाई,कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे,डाॅ. मिलिंद कुलकर्णी,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सहदेव उर्फ आण्णा खाडये, खारेपाटण शक्तीप्रमुख सूर्यकांत भालेकर,सरपंच हनुमंत तळेकर, तालुका सरचिटणीस पंढरीनाथ वायंगणकर, महिला मंडलाध्यक्ष हर्षदा वाळके,माजी सरपंच साक्षी सुर्वे,ओझरम उपसरपंच प्रशांत राणे,कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे,माजी उपसरपंच शैलेश सुर्वे,दिपक नांदलसकर, दिनेश मुद्रस, शशांक तळेकर संजय पाताडे,राजु जठार, चिन्मय तळेकर,राजा जाधव, चंद्रकांत तळेकर, देवकी तळेकर याच्यासह कणकवली ग्रामीण मंडल व विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी कॉलेज, तळेरेचे एन.सी.सी. विभागाचे विद्यार्थी सहभागी होते.
रॅलिला संबोधित करताना डाॅ. मिलिंद कुलकर्णी पुढे म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हे जगाला आपली ताकद दाखवून देणारे ठरल असून आपल्या वायू दलाने जी कामगिरी केली आहे ती हेवा वाटणारी ठरली आहे. यात देशाचे नेतृत्व करणारी नारीशक्ती भारतीय सशस्त्र दलातील महिला अधिकारी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरैशी कुरेशी यानी देशाचे सामर्थ्य जगाला दाखवून दिले की पाकिस्तान हा दहशतवादी लोकांचे आश्रय स्थान आहे त्याना आधार,आश्रय देणारा आहे. जी कामगिरी आपल्या लष्कराने केली त्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आजची तिरंगा यात्रा झाली. शेवटी तळेरे बसस्थानक येथे यातिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला.












