चिपळूण येथे अल्ताफ नाईक यांच्या घरावर वीज पडून मोठे नुकसान

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील शंकरवाडी रोडवर रात्री अवकाळी वादळी पावसामुळे अल्ताफ नाईक यांच्या घरावर वीज पडून त्यांच्या घरातील विजेची सर्व उपकारणे जळून गेली. पाण्याच्या सिमेंट काँक्रिटच्या टाकीला तडे गेले. यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले. अनेक मान्यवराची घटनास्थळी भेट दिली. काल रात्री व आज बीजेपीचे शहाराध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक विजय चितळे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, ओतारी यांनी प्रत्यक्षात येऊन विचारपूस केली व घटनास्थळाची पाहणी करून शासनाने विशेष बाब म्हणून यांना मदत द्यावी, अशी मागणी केली.

सामाजिक कार्यकर्ते व त्यांची बहीण रेहाना बिजले यांना माहिती समजताच मुंबईतुन चिपळूणमध्ये आल्या. सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे अल्ताफ नाईक यांना फोन केले तर उदय ओतारी, रोऊफ वांगडे, नाझीम अफवारे असे समाजातील अनेक मान्यवरांनी अल्ताफ नाईक यांची विचारपूस केली. अल्ताफ नाईक यांच्या घराचे जवळपास चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे. त्यांची आई, पत्नी, मुलगी यांना मानसिक धक्का बसला आहे. या घटनेचा पंचनामा प्रशासनाने केला आहे.