मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.५३ टक्के

 

 

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्याचा दहावी (२०२३) परीक्षेचा निकाल ९९.५३ टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ठ १०६५ विद्यार्थ्यांपैकी १०६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

४९८ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. प्रथम श्रेणीत ४०६ तर द्वितीय श्रेणीत १३८ आणि उत्तीर्ण श्रेणीत १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील एकूण ३५ शाळांपैकी ३२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.