आठवडा बाजार येथे गांजा सेवन करणार्‍या विरोधात कारवाई

रत्नागिरी ः प्रतिनिधी :शहरातील आठवडा बाजार येथील एका पडक्या इमारतीच्या बाजुला गांजा सेवन करणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 23 मे रोजी रात्री 8 वा. सुमारास करण्यात आली.
मनोज मनोहर नाचणकर (57,रा.तेलीआळी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्रौढाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार शांताराम झोरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री 8 वा. सुमारास संशयित मनोज नाचणकर हा आठवडा बाजार येथील एका पडक्या इमारतीच्या बाजुला मोकळ्या जागेत आडोशाला गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करताना मिळून आला. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस अ‍ॅक्ट 1985 चे कलम 8 (क),27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.