शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा उबाठाला पुन्हा धक्का

उबाठा युवासेना देवली शाखाप्रमुख सहकाऱ्यांसह शिवसेनेत दाखल

आमदार निलेश राणे यांच्या गतिमान विकास कार्यावर प्रेरित होऊन पक्षप्रवेश

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या गतिमान विकास कार्यावर प्रेरित होऊन मालवण कुडाळ मतदारसंघात शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु आहे. देवली येथील उबाठा युवासेना शाखाप्रमुख गणेश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.

 

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उबाठा गटाला धक्यावर धक्के देत आहेत.

 

राहुल चव्हाण, प्रकाश चव्हाण, वेदिका चव्हाण, उमेश चव्हाण, प्रतिक देऊलकर, शशिकांत चव्हाण यांनी गणेश चव्हाण यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांसह यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.