बांदा : प्रतिनिधी
बांदा – गडगेवाडी येथील साक्षी दत्ताराम सावंत (वय २०) या युवतीने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.











