पेंडखळे येथील ब्राम्हणदेव मंदिराजवळील कोसळलेल्या साकवाची तत्काळ होणार दुरुस्ती

आ. किरण सामंत यांच्याकडून तात्काळ दखल

जि. प. बांधकाम विभागाकडुन पहाणी अंती कार्यवाही सुरू

राजापूर प्रतिनिधी तालुक्यातील पेंडखळे येथील पेंडखळकरवाडीतील ब्राम्हणदेव मंदिराजवळील वहाळावर मोडकळीला आलेला लोखंडी साकव शनिवारच्या मुसळधार पावसात कोसळला आहे. याची तात्काळ दखल घेत आमदार किरण सामंत यांनी सदरचा साकव तात्काळ दुरूस्त करण्याचे निर्देश जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिले आहेत. तर तहसीलदार विकास गंबरे यांनी देखील या घटनेची दखल घेत कार्यवाही कण्याच्या सुचना दिल्या आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागिय अधिकारी भालचंद्र भालेकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असुन सदरचा साकव दुरूस्त करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.
तालुक्यातील पेंडखळे येथील पेंडखळकरवाडीतील ब्राम्हणदेव मंदिराजवळील वहाळावरील साकवाची पुरती पुरती दुरावस्था झाली होती. गेली तीन वर्षे या साकवाची दुरूस्ती करावी अशी मागणी करून व ग्रामपंचायतीने ठराव करूनही संबधित विभागाने लक्ष दिले नव्हते अखेर शनिवारी मुसळधार पावसात हा साकव मोडून पडला. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
याची तातडीने आ. किरण सामंत यांनी दखल घेतली असुन संबधित विभागाला सदरच्या साकवाची पहाणी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना देतानाच सदरचा साकव तातडीने दुरूस्त् करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेनेनंतर जि. प. बांधकाम विभागाने दखल घेत पहाणी केली असुन सदरचा साकव तातडीने दुरूस्त करून देण्याबाबत कार्यवाही हाती घेतली आहे.