तळवलीत भाजपच्या संपर्क कार्यालयाचा माजी आम. डॉ.विनय नातूंच्या हस्ते शुभारंभ

गुहागर | प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा तळवली पंचायत समिती गटाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप नेते आणि माजी आमदार विनय नातू यांच्या हस्ते सोमवारी पार पडले.

यावेळी व्यासपीठावर भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, माजी सभापती सुरेश सावंत, तालुका सरचिटणीस सचिन ओक आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप पदाधिकारी मंगेश जोशी यांच्या संकल्पनेतून निर्माण केलेले हे संपर्क कार्यालय येथील जनतेच्या विविध समस्या मांडण्यासाठी व त्या सोडवण्याकरिता महत्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. यावेळी बोलताना भाजप नेते माजी आम. डॉ. नातू म्हणाले की,येथील जनतेच्या समस्या या कार्यालयाच्या माध्यमातून येथील कार्यकर्त्यांनी सोडवून त्याचा आदर्श तालुक्याला घालून द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी सांगितले की तुम्हाला ॲक्टर हवा की डॉक्टर हे ठरवा व आपले नेते डॉ. विनयजी नातू यांच्यामाध्यमातून याठिकाणी पुन्हा गतवैभव प्राप्त करू.तसेच मंगेश जोशी यांनी या करायलासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचे विशेष अभिनंदनदेखील त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिनेश बागकर यांनी केले.यावेळी तळवली पंचायत समिती गणातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.