ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेची तस्करी व कत्तल मोठया प्रमाणात होण्याची शक्यता

गोहत्या रोखण्यासाठी राज्यातील पोलिसांना योग्य ते निर्देश द्या

आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांचे लक्ष वेधले

मालवण | प्रतिनिधी : संपूर्ण देशामध्ये ईद हा सण साजरा केला जातो. ६-७ जून २०२५ रोजी होणाऱ्या ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेची तस्करी व कत्तल होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तरी गोहत्या रोखण्यासाठी राज्यातील पोलिसांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे.

 

मुंबई पोलीस महासंचालक कार्यालय येथे महाराष्ट्र पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची आमदार निलेश राणे यांनी भेट घेतली. यावेळी प्रामुख्याने गोमातेची तस्करी व कत्तल रोखण्यासाठी कार्यवाही करावी. ही मागणी करतं त्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.