रत्नागिरी | प्रतिनिधी : भारतीय राजकारणी, समाजसुधारक स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरीतील सावरकरांच्या विविध स्मृती स्थळांचे दर्शन घेतले आणि अभिवादन केले.

सुरुवातील त्यांनी लक्ष्मी चौक, गाडीतळ, रत्नागिरी येथील “स्वातंत्र्य वीर सावरकर” यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून वंदन केले तसेच “पतित पावन मंदिर” येथे भेट दिली. “स्वातंत्र्य वीर सावरकर” हे रत्नागिरी मध्ये असताना शिरगांव, रत्नागिरी येथील दामले यांच्या घरात राहत होते. त्यांनी ज्या खोलीत वास्तव्य केले होते ती खोली दामले कुटुंबाने ऐतिहासिक खजिना म्हणून जतन केली आहे. याच ऐतिहासिक खोलीला श्री. नितीन बगाटे यांनी भेट दिली व दामले कुटुंबियां सोबत चर्चा केली. यावेळी विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे हेही उपस्थित होते.












