कर्ला-लिमयेवाडी येथील पोलिस पाटील उदय लिमये यांची आत्महत्या

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या कर्ला-लिमयेवाडी येथील पोलिस पाटलाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवार 28 मे रोजी दुपारी 2 वा. सुमारास उघडकीस आली.
उदय मधूसूदन लिमये (56,रा.कर्ला-लिमयेवाडी,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या पोलिस पाटलाचे नाव आहे. बुधवारी त्यांची पत्न्ाी नेहमी प्रमाणे अंगणवाडीत नोकरीनिमित्त गेली होती. त्यामुळे उदय लिमये हे घरी एकटेच होते. दुपारी 2 वा. सुमारास त्यांची पत्न्ाी घरी परतली असता त्यांना पती उदय लिमये घराच्या छताला असलेल्या हुकला रस्सीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांच्या पत्न्ाीने आरडा-ओरडा करत ही बाब शेजारीच राहणार्‍या त्यांच्या भावाला जाउन सांगितली. त्याने तातडीने उदय लिमये यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उदय लिमये यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी आणि भाउ असा परिवार आहे.