मालवण | प्रतिनिधी : पावसाळी कालावधील विजेची समस्या मोठया प्रमाणात असतात. अनेकं ठिकाणी तारा तुटणे, लाइनवर झाड कोसळले अशा घटना घडत असतात. गावात विजेची कोणतीही समस्या उद्भभवल्यावर गावातील वायरमन पावसाची तमा न बाळगता कार्यरत राहून विजेची समस्या दूर करतात. या वीज कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने उद्योजक केदार झाड यांच्याकडून वीजकर्मचार्यांना रेनकोट भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
वायरी भूतनाथ येथील हॉटेल मायरा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजक केदार झाड, संदीप बोडवे, देवानंद लोकेगावकर, शाम झाड, मिलिंद झाड, रविंद्र खानविलकर , धनंजय रोगे, समीर गोवेकर, समीर पाटकर, लीलाधर झाड , विशाल वेंगुर्लेकर, जगदीश वेंगुर्लेकर, सुदेश परकर, सुनील वेंगुर्लेकर, रुद्राक्ष कांदळकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी वायरी भूतनाथ येथील लाइनमन श्रीपाद चेंदवंदकर, योगेश परब, तारकर्ली येथील लाइनमन रामचंद्र आंबेरकर, देवली येथील लाइनमन प्रकाश मांजरेकर, देवबाग येथील लाइनमन सिद्धेश परब, गणेश पालव, रवींद्र अहिरे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना चेंदवणकर म्हणाले, वायरी तारकर्ली, देवबाग गावात वीज कर्मचारी म्हणून काम करताना नागरिकांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. वीज कर्मचारी म्हणूनही आम्ही कर्तव्यात कोणतीही कसूर यापुढेही राहणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सर्व वीज कर्मचाऱ्यांनी उद्योजक केदार झाड यांचे आभार मानले.










