देवगड आगारातून विशेष बससेवा : श्रावण महिन्यात दर्शन यात्रेची व्यवस्था

श्री क्षेत्र मार्लेश्वर ,गणपतीपुळे, कोंडामा बाळूमामा हडपिड श्री स्वामी समर्थ मठ याठिकाणी देवदर्शनाची भाविकांना संधी

 

देवगड (प्रतिनिधी)पवित्र श्रावण महिन्यानिमित्त देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, देवगड आगार तर्फे यासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या यात्रेमध्ये श्री क्षेत्र मार्लेश्वर, श्री क्षेत्र गणपतिपुळे, श्री स्वामी समर्थ मठ हडपीड, बाळूमामा कोंडामा अशा प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश असून, प्रवाशांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

देवगड , जामसंडे,तळेबाजार, शिरगाव,नांदगाव, श्री क्षेत्र मार्लेश्वर, श्री क्षेत्र गणपतीपुळे, नांदगाव मार्गे देवगड असा प्रवासाचा मार्ग असून ११ ऑगस्ट २०२५,१६ ऑगस्ट २०२५, २८ ऑगस्ट २०२५ अशा प्रवासाच्या तारखा आहे.या फेरीचा पूर्ण तिकीट रुपये ५७५/-, ६ ते १२ वर्षांखालील मुले व महिलांसाठी अर्धे तिकीट रुपये ३७८/-, ६५ ते ७५ वर्षे दरम्यानच्या नागरिकांसाठी अर्धे तिकीट ₹३७८/-, तर ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत, फक्त ₹५/- बुकिंग शुल्क, २/४ नागरिकांसाठी – ₹१०४९/- या फेरी साठी या अटी आहेत. आगाऊ बुकिंग ७ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाले आहे. पूर्ण ४२ सीट्स आरक्षित झाल्यावरच बस सोडण्यात येईल. ग्रुप बुकिंगही स्वीकारण्यात येईल. वाटेत जेवण व इतर खर्च प्रवास भाड्यात समाविष्ट नाही.

बस बुकिंगसाठी व अधिक माहितीसाठी श्री. विजयकुमार घोलप (आगार व्यवस्थापक) श्री. श्रीकांत सैतवडेकर (सहाय्यक अधीक्षक), श्री गंगाराम गोरे (सहाय्यक वाहतूक नियंत्रक) यांच्याशी संपर्क साधावा असे एसटी प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.