ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे ३० रोजी विद्यार्थी गुणगौरव 

सावंतवाडी । प्रतिनिधी : ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार ३० जून रोजी सकाळी १० वाजता कळसुलकर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. सुभाष पणदूरकर हे असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश बोंद्रे,

जी. बी. वाडकर, नरेंद्र देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात विशेषतः गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल. यामध्ये कु. विधिता केंकरे (बी.ए., संगीत महाविद्यालय, मुंबई), कु. वैभवी बांदेलकर (९५ टक्के), निशाद सावंत आणि सुमुख केंकरे (८७ टक्के), आदी पाटील (९७.६० टक्के), कु. गायत्री परब (९६ टक्के), कु. रिना रा. वेंगुर्लेकर (९३ टक्के) आणि ऋषी वेंगुर्लेकर यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या अवनीश लोंढे आणि कु. आस्था अ. लोंढे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

तसेच, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांनाही सन्मानित केले जाईल.

यामध्ये बालसाहित्यिक मनोहर परब (समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ‘चांगल्या सवयी’ आणि ‘पुस्तकाची निवड’ यांवर मार्गदर्शन) आणि मुख्याध्यापकपदी नव्याने नियुक्त झालेले श्री. एस. व्ही. भुरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे वाय. पी. नाईक, जावेद शेख, एस. आर. मांगले, निलेश पारकर आणि विनायक गावस यांनी सर्व नागरिकांना या गुणगौरव सोहळ्याला उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.