खेड मधील तरुणीची सोशल मीडिया द्वारे ब्लॅक मेल करणाऱ्यास खेड पोलिसांनी केले जेरबंद 

खेड(प्रतिनिधी)सोशल मीडिया व फोन द्वारे तरूणी चा पाठलाग करत सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून फोटो व्हायरल करणाऱ्या २८ वर्षीय तरुणास येथील पोलिसांनी पवई मुंबई येथून शिताफीने गजाआड केले

 

कृष्णकांत सुभाष वैध वय-२८ वर्षे रा. रूम नं. ०३, वैदय चाळ, पोसपोली गाव, साखीविहार रोड, निती पवई असे त्या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे

 

खेड मधील एका तरुणीच्या मोबाईल वर नोव्हेंबर २०२४ ते दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी या कालावधीत संशयित याने त्याच्या व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांकावरून व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांकावर यावर अश्लील मेसेज करून, तसेच फिर्यादी यांना वारंवार फोन करून त्यांचा ऑनलाईन छुपा पाठलाग करून, फिर्यादीना अश्लील शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी देवून, तसेच इंस्टाग्राम अॅप्लीकेशनचा वापर करून तरुणीचे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट काढून त्याद्वारे फिर्यादी यांचे फोटो व्हायरल करत ब्लॅकमेल केले म्हणून येथिल पोलिस स्थानका त गुन्हा दाखल करण्यात आला होता

 

या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, . उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भागौजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन पांडुरंग भोयर असे नेमणूकी तपास पथकासह या गुन्हयाचा तपास करीत होते .

 

सदर गुन्हयातील संशयित याचा तांत्रिक व गोपनिय माहीतीच्या आधारे तपास करता सदर गुन्हयातील संशयित हा निती वसई मुबंई येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर ठिकाणी तपास पथक पाठवून शिताफीने एका इसमास पकडून त्याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये सदर आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयितबकृष्णकांत सुभाष वैध . अटक करण्यात आलेले आहे. अटकेदरम्याने गुन्हयात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे.

 

सदरची कामगीरी ही प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर दिपक गोरे,अजय कडू

राम नागुलवार, वैभव ओहोळ रमिज शेख (टेक्निकल अॅनेलीसीस विंग) यांनी केली