एसटी वाहतूक, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा! शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दक्षता घ्या
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० मे पासून आतापर्यंत 536 मिलिमीटर मान्सूनपूर्व पाऊस झाला. या मान्सूनपूर्व पावसामुळे 26 हेक्टर क्षेत्रात कृषी उत्पादनाचे नुकसान झाले आहे. जवळपास 91 घर व गोट्यांचे औषधा नुकसान झाले आहे. यामुळे 175 शेतकरी बाधित झाले आहेत. याच काळात सर्पदंशाने एक व विजेच्या धक्क्याने एक असे दोन मृत्यू झाले आहेत. याबाबतचा आढावा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी घेत जिल्ह्यातील शेतकरी विद्यार्थी व नागरीक यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यानी गतिमान सेवा द्यावी. आपत्तीची देय नुकसान भरपाई तातडीने द्यावी. जिल्ह्यातील नागरिकांना
अशा आपत्तीच्या काळात तत्पर सेवा द्या अशा सूचना त्यांनी दिल्या.
खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी भवनात झाली. जिल्ह्यातील अवकाळी पाऊस, आपत्तीचा काळ याबाबतचा आढावा त्यांनी घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी यावर्षी झालेले एकूण पर्जन्यमान व नुकसान भरपाईचा आढावा दिला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्सून पूर्व पावसामुळे जिल्हात शेतकऱ्याचे जे नुकसान झाले आहे त्या बाधित शेतकऱ्यांना देय असलेली नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊल उचलावे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 91 घर गोठे यांचे औषधा नुकसान झाले असून जवळपास 31 लाखाचे नुकसान आहे तर आठ कच्चे घर नुकसान झाले असून ते दीड लाखाचे आहे. त्याबाबत देय नुकसान भरपाईची रक्कम तातडीने द्या अशा सूचनाही खासदार नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्यातील एसटी बसेस सेवा सुरळीत राहावी म्हणून त्याचाही आढावा त्यांनी घेतला. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्या याकडेही विभाग नियंत्रकांनी गांभीयाने पहावे अशा सूचना दिल्या. नैसर्गिक आपत्ती मध्ये वीस पुरवठा खंडित होऊ शकतो मात्र याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानी दक्षता घ्यावी. असा सूचना दिल्या
नुकत्याच झालेल्या पावसामध्ये 38 पोल पडले होते 41 ट्रांसफार्मर बंद पडले होते त्याची दुरुस्ती होऊन सध्या जिल्ह्यात कोणत्याही गावात विद्युत पुरवठा खंडित नाही अशी माहिती या बैठकीमध्ये अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली.
जिल्ह्याच्या कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईक नवरे यानी जिल्ह्यातील शेती विषयक परिस्थितीचा आढावा दिला. या जिल्ह्यात भाताचे चांगले उत्पादन होत असून त्यापेक्षा रायगड जिल्ह्याचे मोठे उत्पादन आहे. या जिल्ह्यात भाताच्या कोणत्या जाती आणखी जास्त उत्पादन देऊ शकतील याचा अभ्यास करून त्यातीही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी तशा पद्धतीचे भात बियाणे उपलब्ध करून द्यावे अशा सूचना नारायण राणे यांनी केल्या.
Box
वेंगुर्ले येथे कोस्ट गार्ड प्रशिक्षण केंद्र व स्पोर्ट कॉम्प्लेक्स करण्याचा मानस.
वेंगुर्ला येथे नेव्ही किंवा कोस्टगार्डचे एक प्रशिक्षण केंद्र व एअरपोर्टच्या नजीक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करण्याचा मानस आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये 50 निवासी सूट व क्रीडांगण विकास केला जाईल. नेव्ही किंवा कोस्ट गार्डच्या प्रशिक्षण केंद्रामुळे या जिल्ह्याला विशेष महत्त्व येईल असा विकास आपल्याला करायचा असून तसे प्राथमिक बोलणे सुरू आहेत असेही या निमित्ताने बोलताना माजी खासदार नारायण राणे यांनी सांगितले. आपण पहिल्यांदा या भागाचा जेव्हा आमदार झालो त्यावेळी विकासाच्या अनेक टप्प्यावर मागे असलेला जिल्हा व तो विकासाच्या टप्प्यावर आणताना घडलेले किस्से सांगताच उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चांगलीच दाद दिली.











