कोकण ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बाजारपेठ उपलब्ध करणार: ना: योगेश कदम

दापोली l प्रतिनिधी: ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बाजारपेठ उपलब्ध करणार असल्याचे तसेच प्रामाणिक काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा विचार आहे असे मनोगत गृह राज्य आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री ना योगेश कदम यांनी व्यक्त केले ते २९ मे रोजी श्री शैल सभागृह जालगाव येथे दापोली व्यापारी संघटनेच्या मेळाव्याप्रसंगी बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले ” अन्न व औषध प्रशासनतर्फे सर्वात कमी कार्यवाही झालेला विभाग म्हणजे कोकण. अध्यक्ष आवळे यांनी दापोली तालुका व्यापाऱ्याच्या अनेक समस्या सांगितल्या हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुढील महिन्यात मंत्रालयात दापोली व्यापाऱ्यांची बैठक लाऊ . कोकणात डोंगर,दर्या, जंगल यातून विजेचे पोल उभे आहेत त्यामुळे झाड पडल्यास किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास वीज पुरवठा खंडित होतो त्यासाठी भूमिगत वीजपुरवठा करण्याचा विचार आहे.कोकण ग्रामीण पर्यटन दृष्टिकोनातून बाजारपेठ उपलब्ध करणार आहे. ज्यामुळे स्थानिक तरुणान रोजगार मिळेल आणि कोकणी वस्तूंना मोठी बाजारपेठ मिळेल .बाहेरून येणारे फिरते व्यापाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश देणार आहे.आपल्या लोकांनी व्यापाऱ्यात आले पाहिजे.पारंपरिक बरोबर आधुनिक तंत्रद्य शिकले पाहिजे. अन्न आणि औषध प्रशासन कडून व्यापाऱ्यांना सहकार्य मिळेल. संबंधिक खात्याकडून व्यापाऱ्यांना जो त्रास होतो त्यासाठी मी स्वतः लक्ष घालेन.असे शेवटी ते म्हणाले.

यावेळी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे हे म्हणाले” व्यापारी विखुरलेला आहे त्यामुळे त्याला जास्त त्रास दिला जातोय. करोना योद्धा व्यापारी आहे.कारण कोरोना काळात जीवावर उदार होऊन व्यापाऱ्यांनी जनतेला वस्तुंचा पुरवठा केला.ऑनलाईन मार्केटिंग शिकले पाहिजे त्यासाठी टेक्निकल नॉलेज शिकले पाहिजे. शासनाला सांगणे आहे की व्यापारी कायदा काय आहे हा व्यापाऱ्यांना आधी शिकवा आणि नंतर त्यांच्यावर कार्यवाही करा.पुढील पिढी व्यवसायात यायला तयार नाही कारण व्यापाऱ्यात खूप त्रास आहे.भारतात १८ टक्के प्लास्टिक वापरले जाते त्यापैकी फक्त १ टक्के प्लास्टिक रिसायकलिंग होते आणि १७ टक्के कचऱ्यात जाते ह्याला व्यापारी जबाबदार नाही.खुला माल विकू नका अस अन्न प्रशासन म्हणते मात्र पॅकिंग केलं की ५ टक्के GST लागत.व्यापाऱ्यांनी संघटित रहा.निधी उभा करा स्वतःची बँक तयार करा.तरच टीकाल;

यावेळी दापोली व्यापारी संघटनचे अध्यक्ष विनोद आवळे यांनी प्रास्ताविक केले यावेळी त्यांनी दापोली तालुक्याची व्यापारी संघटना बांधणीसाठी केलेले प्रयत्न आणि दापोली व्यापाऱ्यांच्या समस्या बोलून दाखविल्या.तालुक्यात ज्या व्यापाऱ्याच्या दुकानांना ५० वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिपीन पाटणे,उपाध्यक्ष प्रमोद काटकर, सचिव मिलिंद शेठ,दापोली व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजन मेहता,मिलिंद बारटक्के, मयूरेश फाटक,प्रशांत परांजपे, संदीप राजपुरे तसेच तालुक्यातील असंख्य व्यापारी उपस्थित होते.