कळंबणी रुग्णालयात २ रोजी आरोग्य शिबीर

खेड (प्रतिनिधी)कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात २ जून रोजी महिला कर्करोग तपासणी अभियानांतर्गत कर्करोग मोबाईल व्हॅनद्वारे तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

 

 

या शिबिरात स्तन, पिशवी, मुख, इतर कर्करोग आदी तपासण्या करुन निदान, उपचार केले जाणार आहे. स्त्रीरोग तज्ञ डॉ. बाळाजी सगरे, डॉ. सतीश गवळी रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरात रुग्णांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.