खेड(प्रतिनिधी) खेड रेल्वेस्थानकातील फलाट क्र.१ चे छप्पर वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासाठी ५४ लाख ९ हजार ५६३ रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने रितसर निविदाही काढली आहे. छप्पर उभारणीनंतर स्थानकाचा ‘लूक’ पालटणार आहे.मध्यवर्ती ठिकाणी असलेले येथील रेल्वेस्थानक चारही तालुक्यातील प्रवाशांसाठी सर्वच दृष्टीने किफायतशीर ठरते. येथील स्थानकातून माल वाहतुकीसाठी ‘रो-रो’ सेवा देखील सुरू झाली आहे. यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापाठोपाठ प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता वाढीव छप्परासाठी ५४ लाखांच्या निधीची तरतूद
प्रशासनाने फलाट क्र.१ च्या छप्पर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १४० मीटर लांबीच्या वाडीव छप्पराची उभारणी करण्यात येणार आहे.
दोनच दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाने निविदा काढली आहे. पावसाळा वगळून वाढीव छपराच्या उभारणीसाठी ६ महिन्याचा कालावधी संबंधित ठेकेदाराला देण्यात येणार आहे.










