रत्नागिरी : येथील रत्नागिरी एमआयडीसी येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
यावेळी अमृत गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या कार्याबदल उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाज भवन बांधण्यासाठी पुढाकार घेऊया आणि ते लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊया असा संकल्प या निमित्ताने अमृत गोरे यी व्यक्त केला. तसेच पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचे कार्य लोकांपर्यत पोचवत त्यांच्या कार्याची माहिती द्यावी व सर्व सरकारी कार्यालय व जिल्हा परिषद शाळा यामध्ये अहिल्या देवी होळकर याची प्रतिमा लावण्यासाठी जिल्हाधिकारी याना निवेदने देण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.
यावेळी संतोष झोरे, अमृत गोरे, मंगेश वरक, सुरेश येडगे, पार्थ बावदाणे, संजय आखाडे, तुषार झोरे, दर्शन झोरे, सुयश झोरे, शिवाजी राठोड, साक्षी झोरे, समृद्धी झोरे , अक्षता झोरे, अमित चव्हाण, शेर शाह, छान शाह, अनिल कुमार, स्वयम शेळके आदि उपस्थित होते











