वेंगुर्ले गावची सुकन्या कु. किरण मेस्त्री ठरली “चार्मिंग मिस इंडिया २०२५” या किताबाची मानकरी….

नवी मुंबई येथे संपन्न झाली स्पर्धा..

वेंगुर्ले l दाजी नाईक :गुर्मीत गरहा ग्रूमिंग स्कूल नवी मुंबई तर्फे जुईनगर येथे घेण्यात आलेल्या मिस, मिसेस आणि मिस्टर इंडिया या मानाच्या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले गावची सुकन्या कु. किरण शितल शरद मेस्त्री हिने “चार्मिंग मिस इंडिया २०२५” हा किताब पटकावला आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नवी मुंबई येथे झालेली ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार होत गेली. स्पर्धेदरम्यान किरण मेस्त्री हिने आपल्या पर्यटन दृष्ट्या बदलत्या वेंगुर्ले ची खास अशी ओळख करून दिली. दरम्यान या स्पर्धेमध्ये मिस इंडिया स्पर्धेसाठी एकूण आठ स्पर्धक सहभागी झाले होते. यामधून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी किरण मेस्त्री मिस इंडिया किताबाची मानकरी ठरली.

या स्पर्धेचे परीक्षण नावाजलेले परीक्षक अमर सोनवणे, सुंदर अलेक्झेंडर, सूरज कुमार, स्वीकृती श्रीवास्तव, फरहान रमझान यांनी केले. तर स्नेहा सिंग यांनी आपल्या खास शैलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. किरण मेस्त्री हिचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.