धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार उत्सव
वैभववाडी l प्रतिनिधी : करुळ भट्टीवाडी येथे वाघजाई देवी वर्धापन दिन सोहळा रविवार दि. 19 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. भट्टीवाडी सेवा मंडळ मुंबई व भट्टीवाडी ग्रामस्थ मंडळ करूळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव भट्टीवाडी येथील वाघजाई मंदिरात पार पडणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे – 19 एप्रिल रोजी सकाळी 5 वा. वाघजाई देवीचा अभिषेक, सकाळी 6 वा. होमहवन, सकाळी 10 वा. वाघजाई देवी पादुकां मिरवणूक सोहळा, सकाळी 11:30 वा. सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 12:30 नंतर भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी 3 वा. महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी 5 वा. महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रम व आकर्षक बक्षीसे, रात्री 8 : 30 वाजता प्रमुख मान्यवरांचा सत्कार सोहळा, रात्री 9 वाजता महिलांचा डबलबारीचा जंगी सामना- बुवा साची मूळम गजानन प्रासादिक महिला भजन मंडळ पुरळ तालुका देवगड विरुद्ध बुवा स्वराली नाटेकर भैराई देवी प्रासादिक महिला भजन मंडळ मोंड तालुका देवगड यांच्यात होणार आहे. तरी या कार्यक्रमाला गावातील व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.










