फणसोप हायस्कुलच्या मागील बायपास रोडवरील घटना
रत्नागिरी ः प्रतिनिधी
भरधाव दुचाकीसमोर अचानकपणे कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सूटून अपघात झाला. अपघाताची ही घटना रविवार 1 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा.सुमारास फणसोप हायस्कुलच्या मागे बायपास रोडवर घडली. दुचाकीवरुन ट्रिपल सिट जात असताना यात गंभिर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा सख्या भावाचा मृत्यू झाला असून तिसरा स्वार जखमी झाला आहे.
जयप्रकाश चंन्द्रीका यादव (53) आणि त्याचा त्याचा भाउ ओमप्रकाश चंन्द्रीका यादव (51,दोन्ही मुळ रा.गाझीपूर उत्तरप्रदेश सध्या रा.फणसोप सडा,रत्नागिरी) या दोघांचा मृत्यू झाला. याबाबत संभाजी बंकट हुलगे (21,मुळ रा.लातूर सध्या रा.फणसोप सडा,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री जयप्रकाश यादव आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-बीजे-3856) वर पाठीमागे त्याचा सख्खा भाउ ओमप्रकाश आणि संभाजी हुलगे यांना ट्रिपलसिट बसवून पावस ते रत्नागिरी रस्त्याने येत होता. त्यांची दुचाकी फणसोप हायस्कुलच्या मागे बायपास रोडवर आली असता दुचाकीसमोर अचानकपणे कुत्रा आडवा आला. त्यामुळे जयप्रकाश यादवचे दुचाकीवरील नियंत्रण सूटल्यामुळे दुचाकी रस्त्याच्या साइड पट्टीच्या बाहेर जाउन अपघात झाला. यात यात रस्त्याच्या बाजूचे चिरे-दगड डोक्याला लागून जयप्रकाश यादव व ओमप्रकाश यादव गंभिर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर संभाजी हुलगेलाही दुखापत झाली. अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.













