चिपळूण (प्रतिनिधी) : ‘एक्सप्लोर कोकण’ या पर्यटन निगडित संस्थेतर्फे कोकणातील निसर्गाचे व विविध पर्यटन स्थळाचे फोटो व शार्ट व्हिडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदरची स्पर्धा रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असणार आहे. निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेल्या कोकणातील भूप्रदेशाचे सर्वांनाच आकर्षण आहे. कोकणामध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येतात याच कोकणला पर्यटनदृष्ट्या अधिक ‘एक्सप्लोर ‘ करण्याच्या उद्देशाने सदरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये कोणीही भाग घेऊ शकतो. कोकणातील म्हणजेच रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे अधिक लोकप्रिय आणि पर्यटनप्रिय आहेत. मात्र या दोन्ही जिल्ह्यातील न पाहिलेली परंतु अथवा क्वचित पाहिली गेलेली अशी मात्र सुंदर साईट सीन अर्थात पर्यटनदृष्ट्या विकसित होणाऱ्या जागांचे, स्थळांचे फोटो काढून त्याची थोडक्यात माहिती पाठवणे अपेक्षित आहे. एक स्पर्धक कितीही फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकतो. यामध्ये समुद्रकिनारे,धार्मिक स्थळे, जंगल सफारी, गड -किल्ले तसेच धबधबे, डोंगर- दऱ्या आदी पर्यटन स्थळांचा समावेश होऊ शकतो. स्पर्धकाने लोकप्रिय स्थळे शक्यतो टाळून नव्या वा क्वचित पाहिले गेलेल्या सुंदर स्थळांचे फोटो काढून ते संस्थेकडे पाठवावेत. ज्या स्पर्धकाला व्हिडिओ करावयाचा आहे त्याने जास्तीत जास्त ४० सेकंद ते एक मिनिट पर्यंत व्हिडिओ काढून सोबत त्या स्थळाची माहिती पाठवावी. व्हिडिओ रॉ असावा. त्याला कोणतेही म्युझिक अथवा टायटल अथवा त्यामध्ये स्वतःचा प्रत्यक्ष सहभाग नसावा. भाग घेणाऱ्या स्पर्धकांने स्पर्धेला पाठवलेला फोटो अथवा व्हिडिओ हा स्वतःचाच असल्याचाही प्रकटन देणे आवश्यक आहे. कोणत्याही कॉपीराईट अथवा इतर फोटो घेऊन ते पाठवू नयेत असेही संस्थेने कळवले आहे.
सदरचे फोटो अथवा व्हिडिओ हे व्हाट्सअप नंबरवर अथवा मेल आयडी वर स्पर्धक पाठवू शकतात सोबत आपली सर्व माहिती आणि संपर्क क्रमांक देणे गरजेचे आहे. या स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धकांनी १० ऑगस्ट २०२५ पर्यंत स्पर्धेचे फोटो आणि व्हिडिओ पाठवावेत. यामध्ये प्रत्येकी तीन क्रमांक निवडण्यात येतील. पहिल्या क्रमांकामध्ये ३००० हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी २००० व तिसऱ्या क्रमांकासाठी १००० रुपये असे पारितोषिके ठेवण्यात आली आहेत व विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान येणार आहेत. याशिवाय दहा उत्तेजनार्थ क्रमांक निवडण्यात येतील व त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपले फोटो व व्हिडिओ ८८५५०४४२२५ या व्हाट्सअप क्रमांक वर अथवा explore.kokan10@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन एक्सप्लोर कोकण तर्फे करण्यात आले आहे.











