गौरव पोंक्षे l माखजन : एकविसावे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते.या एकविसाव्या शतकात आत्ताच्या विद्यार्थ्यांना भविष्यतील सक्षम नागरिक बनणे गरजेचे आहे.आणि एकविसाव्या शतकातील वाटचाल करताना सुजाण नागरिक बनवणे ही सर्वतोपरी शाळांची आणि पर्यायाने शिक्षकांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन प्रा सागर पोकळे यांनी केले.ते रत्नागिरीतील फाटक हायस्कुल मध्ये वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणात ‘एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये’या विषयावर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार कौशल्य,सर्जनशील विचार कौशल्य सहयोग कौशल्य,संप्रेषण कौशल्य,माहिती साक्षरता, मध्यम साक्षरता,तंत्रज्ञान साक्षरता,लवचिक आणि अनुकूलता,नेतृत्व आणि जबाबदारी,पुढाकार आणि स्व दिशा,उत्पादकता,सामाजिक आणि बहुसांस्कृतील संवाद आदी कौशल्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्यापनात शिकवायला हवीत.तरच एकविसाव्या शतकासाठी सक्षम पिढी बाहेर पडेल.असे मत मांडले.
विद्यार्थ्यांना वर्गात स्वतःचे मत,विचार,कल्पना मोकळेपणाने वर्गात मांडण्याचे स्वातंत्र्य ठेवले पाहिजे.विद्यार्थ्याना जास्तीत जास्त अध्ययन अनुभव द्यावेत,विद्यार्थ्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित करावी व विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन द्या असे संगितले.
रत्नागिरी येथे सुरू असलेले प्रशिक्षण हे डाएट चे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर,राहुल बर्वे,राजेंद्र लठ्ठे,यांच्या मार्गदर्शनासाठी तर अश्विनी काणे ह्या साधनव्यक्ती म्हणून काम पाहत आहेत.
तर प्रा प्रभात कोकजे,प्रा सागर पोकळे,प्रा एस आर जोपळे,प्रा सौ मानसी गानू, मोहन बापट,दिगंबर गवळी,वर्षा घाग,विभा बाणे, सुधीर शिंदे,अनंत जाधव,विष्णू पवार,आदी सुलभक म्हणून काम पाहत आहेत.













