जालगाव येथे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक रोप दोन खड्डे संकल्पनेचा शुभारंभ

दापोली l प्रतिनिधी: – पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत “एक पेड मा के नाम” या शासनाच्या ब्रीद वाक्यानुसार घर तिथे वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे .याचा शुभारंभ जालगाव ग्रामपंचायत सभागृह येथे वृक्षपूजनाने करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर दापोली वन अधिकारी प्रकाश पाटील,वनविभागाचे खोत, सरपंच अक्षय फाटक, उपसरपंच स्वप्निल भाटकर, गावसई उपाध्यक्ष रमेश कडू आणि माझी वसुंधरा अभियान अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते ग्रामस्थांना वृक्षवाटप करण्यात आले.यानंतर

वृक्ष संवर्धन आणि जलसंवर्धन याची सांगड घालण्याच्या उद्देशाने डॉ. प्रशांत परांजपे यांच्या संकल्पनेतून एक रोप दोन खड्डे ही संकल्पना कार्यान्वित करण्यात आली असून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरी एक पाझरखड्डा आणि एक रोपट जगविण्याच्या संकल्पनेचा शुभारंभ

भैरी तलाव परिसरात करण्यात आला.

गावातील प्रत्येक घरामध्ये एक रोप मोफत देण्यात येणार असून प्रत्येकाने एक रोप दोन खड्डे संकल्पनेचा अंगिकार करावा आणि पुढील पर्यावरण दिनाला या रोपट्याचा वाढदिवस करावा असे आवाहन सरपंच अक्षय फाटक यांनी केले. या प्रसंगी दापोली वन विभागाचे सर्व अधिकारी,ग्रामपंचायत जालगावचे सदस्य शोभा दांडेकर, चारुता आठल्ये, राजेंद्र चव्हाण, अमित आलम, जयदीप पालकर , तंटा मुक्त अध्यक्ष बापू लिंगावळे ,सर्व सदस्य, ग्रामपंचायत ज्येष्ठ लिपीक विनोद नांदिस्कर , ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थितीत होते.

एक पेड माँ के नाम या मोहिमे अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये आवळा, चिंच, पेरू,कोकम आणि जांभूळ प्रकारची रोपे मोफत उपलब्ध करण्यात आली आहेत. दापोली वनविभाग आणि निवेदिता प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने रोपांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सरपंच अक्षय फाटक यांनी दिली.