जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी महेश चिटणीस यांचे निधन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी महेश चिटणीस (वय ७५) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे. अभिनव फाऊंडेशन, सिंधुदुर्गचे किशोर चिटणीस यांचे ते वडील होत.