उद्या सकाळी अंत्यसंस्कार
दोडामार्ग:
आदर्श गाव केर येथील रत्नप्रभा फटिराव देसाई (वय ८१) यांचे आज शुक्रवार सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा केर गावचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई आणि पशुसंवर्धन विभागाचे (वेंगुर्ला) सहाय्यक आयुक्त डॉ. विद्यानंद देसाई यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या निधनाने केर परिसरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. रत्नप्रभा देसाई यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार, सकाळी १० वाजता केर येथील निवासस्थानाजवळ अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.











