शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र
मालवण | प्रतिनिधी : मालवण दांडी येथील मार्टिना जॉन्सन फर्नांडिस यांची सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना अल्पसंख्यांक महिला मालवण शहराध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्षा मालवण पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मार्टिना जॉन्सन फर्नांडिस यांना देत नियुक्ती जाहिर केली.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ मतदारसंघात अनेक विकास प्रकल्प विकास कामे होत आहेत. त्यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन अनेक पक्ष प्रवेश होत आहेत. संघटना मजबूत होत आहे, वाढत आहे. असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी माजी नगरसेवक दिपक पाटकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, अरुण तोडणकर यांसह प्रवीण बाळकृष्ण पराडकर,दुमिंग फर्नांडिस, लुईस फर्नांडिस, शिलु डिसोजा, पॉली डिसोजा, आतोन ब्रागांझा, जॉन फर्नांडिस, रोमन पेडणेकर, प्रेस्टन फर्नांडिस, फातिमा पीटर रॉड्रिक्स, आसू मेंडोसा, लुड्डीन फर्नांडिस, जितेंद्र शिर्सेकर, बबलू मोंडकर, विष्णू मालंडकर, मोनिका फर्नांडिस, फातिमा फर्नांडिस, ऐरॉन फर्नांडिस, मोनिका घोणसाल्विस, लिओ डिसोजा, लिओ काळसेकर, ओमकार मालंडकर, किरण कोयंडे, सुशांत शेलटकर, अमित खरात, प्रवीण हिंदळेकर, स्वप्नील मालवणकर, विकी फर्नांडिस, ईशेद डिसोजा, रॉनी फर्नांडिस, प्रतिभा फर्नांडिस, आबू डिसोजा, प्रीसीला डिसोजा, राजेश परब, संतोष वायंगणकर, निक्की डिसोजा, नरेश कोयंडे, तमास काळसेकर, बॅनी फर्नांडिस, उमेश हडीकर, दर्शन गावकर, मॉरिस फर्नांडिस, बिलाधर शिर्सेकर, सुनील गावकर, वासुदेव खोबरेकर, परेश वाघ, दिनेश परब, रॉबर्ट काळसेकर , मोनगो कोलगे , राजेश हुले आदी उपस्थित होते अशी माहिती दत्ता सामंत यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.











