नाडण पुजारेवाडी येथील ७८ वर्षीय इसम बेपत्ता

देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील नाडण पुजारेवाडी येथील आत्माराम विठोबा मोंडे (वय ७८) हे बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा संदेश आत्माराम मोंडे (४७) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नाडण पुजारेवाडी येथील आत्माराम विठोबा मोंडे हे ६ जून रोजी पहाटे ६ वा. च्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेले. ते अद्याप परत आलेले नाहीत. त्यांच्या सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र ते कोठेही आढळले नाहीत, अशी फिर्याद मुलगा आत्माराम यांनी देवगड पोलिसांत दिली आहे. याबाबतचा तपास हवालदार आशिष कदम करीत आहेत.