मंडणगडमध्ये अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवरच

तालुक्यातील आगीच्या घटनांचा गांभीर्याने विचार करून अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था निर्माण करण्याची गरज. 

मंडणगड : प्रतिनिधी, – तालुक्यात वाढलेल्या आगीच्या घटना व त्याकरिता आग विजवण्यासाठी उपलब्ध नसलेली आवश्यक यंत्रणा त्यामुळे अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकत्याच एका घराला आग लागण्याच्या घटनेबरोबरच यावर्षी शहरातच आगीच्या चार घटना घडल्या आहेत, त्यातील एक घर जवळपास पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अतोनात नुकसान झाले. काही आगीच्या घटनेमध्ये अग्नी तांडव एव्हडे होते कि, नागरिकांना, स्थानिक प्रशासनाला अग्निशमन यंत्रणेशिवाय आग विजवने कसरीतीचे ठरले. या घटनांनंतर तालुक्याला अग्निशामक यंत्रणा असण्याची गरज प्रकर्षाने जाणवली.

आगीमुळे निर्माण होणाऱ्या दुर्घटनांनंतर तालुक्याला स्वतंत्र अग्निशामक यंत्रणा मिळणे आवश्यक बनले आहे. प्रशासकीय दृष्ट्या ते शासकीय सोपस्कारामध्ये लाल फितीत अडकणारे असले तरी किमान नगरपंचायतीला मिळणारी अग्निशामक यंत्रणा शहरासह तालुक्यात वापरता येऊ शकते.मात्र नगरपंचायतीच्या स्थापणेनंतर आठ वर्षाच्या कालखंडात नगरपंचयातीला अग्निशमक यंत्रणा प्रस्थावीत असूनही शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली नाही. नेहमीच मंडणगड नगरपंचायतीस मिळत असल्याची स्थापत्न पणाच्या वागणुकीची ओरड यानिमित्ताने खरी ठरत आहे. व त्याचा फटका येथील नागरिकांना बसत आला आहे. तालुक्यात आगीची दुर्घटना घडली कि, नजीकच्या तालुक्यातील अग्निशमन यंत्रणेला प्राचारण करावे लागते मात्र सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या दापोली, खेड या तालुक्यातून हि यंत्रणा पोहचूपर्यंत एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्या यंत्रणेचा कोणताही उपयोग आगीच्या घटनाक्रमांत होत नाही. तालुक्यातील वेसवी येथील घराला लागलेल्या भीषण आगीची घटना अजूनही ताजी आहे. या घटनेत तर नजीकच्या श्रीवर्धन तालुक्यातून अग्निशमन बंबाला प्राचारण करण्यात आले होते. मात्र वेळेच्या विलंबाने घर आगीच्या भक्षस्थानीही गेले होते. या घटनांचे गांभीर्य प्रशासनाने ओळखले पाहिजे. दरवर्षी आग लागण्याच्या घटना तालुक्यात आता वाढल्या आहेत. अनेक वेळा वणव्याने आंबा, काजूच्या बागा खाक होण्याच्या घटना नेहमीच्याच ठरल्या आहेत.

एकूणच तालुक्यात वाढलेल्या आगीच्या घटना, वाढते शहरीकरण यापार्श्वभूमीवर किमान नगरपंचायत प्रशासनास अग्निशमन यंत्रणेची पूर्तता करणे अत्यंत आवशयक बनले आहे, यासंदर्भात नगरपंचायतीच्या प्रस्थावास प्रशासकीय मंजुरी मिळाली मात्र अद्याप पूर्तता झाली नसल्यची माहिती मिळते. याबाबत लवकर कार्यवाही अपेक्षित आहे. अग्निशमन यंत्रणा तालुक्यात लवकरच कार्यान्वित व्हावी या मागणीला आता नागरिकांमधून जोर वाढला आहे.