रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील निवळी पूल ते निवळी बौध्दवाडी जाणारा सार्वजनिक रस्ता बंद केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 जून रोजी रात्री 10 ते 6 जून रोजी सकाळी 6 वा.कालावधीत घडली आहे.
याबाबत राहुल रमेश सावंत (32,रा.निवळी बावनदी बौध्दवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी यांच्या वाडीतील विवेक दिपक सावंत हे नोकरी निमित्त रत्नागिरी येथे रिक्षाने जात होते. त्यावेळी त्यांना जिल्हा परिषद शाळा निवळी पूल ते निवळी बौध्दवाडी असा जाणारा सार्वजनिक रस्ता अज्ञाताने चिरे लावून बंद केलेला दिसून आला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 285,126 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











