पालीत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

वार्ताहर | पाली : छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा जयजयकार करत तालुक्यातील पाली तिठा येथे आज ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. दुग्धाभिषेक, शिवपूजन करून श्री शिवराजे यांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. गेली २० वर्षे हा ऐतिहासिक जिल्ह्यातील पहिला सुवर्णयोग पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली पाली तिठा येथे साजरा होत असतो.

 

आज सकाळी श्री शिवछत्रपतींना दुग्धाभिषेक करून नंतर पवित्र वातावरणात श्री शिवपूजनाने व जोषपूर्ण उत्साहात श्री शिवघोष करत शिवप्रेमीं तर्फे “श्री शिवराज्याभिषेक” सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी पाली बाजारपेठ व्यापारीसंघाचे अध्यक्ष विश्वास सावंत,रमेश तेंडुलकर,सदानंद पोवार,स्वप्नील सावंत,शेखर सुर्वे,उमेश सावंत,अमेय वेल्हाळ,शैलेश राऊत,सौरभ खाके,सुधिर सावंत,सचिन भोगले, सुभाष धाडवे, मनोज पांचाळ,वैशाली झापडेकर व अनेक शिवभक्त उपस्थित होते.

या सोहळ्याला उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी आवर्जून सदिच्छा व विशेष पाठबळ दिले. महाराष्ट्र क्रिकेट संघटना उपाध्यक्ष व सिंधुरत्न योजना सदस्य आ.किरण सामंत, श्रीलक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. आयोजकांतर्फे पाली केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिष्टचे गुरुनाथ गराकटे(बाबा) यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.