आपली आवड, अभ्यासाची प्रगती पाहूनच अभ्यासक्रम निवडावा- लीला बिरादार

चिपळूण भाजप तर्फे विद्यार्थी सोहळा

चिपळूण (वार्ताहर) : विद्यार्थी वर्गाने भविष्याचा वेध घेत आपली आवड, आपली अभ्यासाची प्रगती हे डोळ्यासमोर ठेऊन १० वी नंतर अभ्यासक्रम निवडावा. खास मित्र किंवा मैत्रीण ज्या महाविद्यालयमध्ये प्रवेश घेते तिथे प्रवेश घेण्यापेक्षा सर्व बाजूने विचार करून अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे, असे केल्यास नंतर त्रास होत नाही, असा सल्ला डीबीजे महाविद्यालयाच्या निवृत्त उपप्राचार्य सौ. लीला बिरादार यांनी दिला. भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडल यांच्या वतीने परशुराम नगर, राधाकृष्ण नगर, रावतळे या भागातील गुणवंत १० वी व १२वी विद्यार्थ्यांचा सत्कार डीबीजे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडला.

या सत्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर महिला जिल्हा अध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, डीबीजे महाविद्यालयाच्या निवृत्त उपप्राचार्य लीला बिरादार, विद्या क्लासेस संचालिका सौ. अमृता जोशी, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू, सौ. प्रणाली सावर्डेकर, साईनाथ कपडेकर आदी उपस्थित होते. आपल्याला काय झेपेल आणि जो अभ्यासक्रम घेणार आहोत तो भविष्यात रोजी रोटी देणार का याची माहिती विद्यार्थ्यांनी घ्यावी. सध्या संगणक विभागात खूप क्रांती झाली आहे. याचा नेमका काय परिणाम होणार याची माहिती घेऊनच मग मार्ग निवडणे गरजेचे असे विद्या क्लासेस संचालिका सौ अमृता जोशी यांनी सांगितले. यावेळी रामदास राणे,शशिकत मोदी, निनाद आवटे, विजय चितळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सोहळ्याचे प्रस्ताविक सौ. प्रणाली सावर्डेकर यांनी केले. तर सूत्रसंचलन अश्विनी पवार यांनी केले. यावेळी ५४ विद्यार्थी यांचा सत्कार भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते झाला. असे सत्कार समारंभ प्रत्येक प्रभागात घेण्याचा मानस चिपळूण भाजपचा आहे. यावेळी विनोद भोबसकर, अभय चितळे, आशिष खातू, विजय चितळे शीतल रानडे, सारिका भावे, रत्नदीप देवळेकर, अनिल सावर्डेकर, शुभम पिसे, मधुकर निमकर, पूनम काजारी, श्रद्धा कदम, गायत्री जोशी, अभिषेक राजापूरकर, शक्ती चव्हाण, ज्ञानेश्वर नलावडे, अभिषेक जागुष्टे, अमित चिपळूणकर, भरत जाधव, कुणाल आंबेकर, श्रेयस पवार आदी उपस्थित होते.