चिपळूण ब्राह्मण संघात ११ रोजी विशाखा चितळे, मानसी जोशी यांचा सन्मान

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणच्या दोन सासुरवाशिणी सौ. विशाखा सदानंद चितळे आणि सौ. मानसी वामन जोशी या दोघींनी गेल्या काही दिवसांपूर्वी नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली. त्या दोघींनी पूर्ण केलेले हे पुण्यकर्म अभिनंदनीय तर आहेच त्याचबरोबर हे अनुकरणीय आहे. त्यांनी हे कार्य कसे पूर्ण केले? किती दिवस त्यांना यासाठी लागले? याबद्दलची उत्सुकता आपणा सर्वाना असणे स्वभाविकच आहे. शिवाय त्यांचा सन्मानही आपल्या चिपळूणच्या ब्राह्मण संघातर्फे व्हायला हवा. यासाठी. चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघाच्या कै. बाबासाहेब बेडेकर सभागृहात या दोघींचा सन्मान आणि त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या दोघींशी संवाद साधून माहिती करून देणार आहेत. चिपळूणचे लोकप्रिय प्रवचनकार धनंजयजी चितळे. तरी आपण सर्वांनी बुधवार दि. ११ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ब्राह्मण संघाच्या हॉलवर उपस्थित रहावे, असे आवाहन ब्राह्मण सहाय्यक संघाच्या संचालक मंडळाने केले आहे.