सुभद्राबाई शिक्षण निधी, मुंबई तर्फे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राजापूर (वार्ताहर): सुभद्राबाई शिक्षण निधी, मुंबई तर्फे दरवर्षी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या व दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारमान्य अशा कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असलेल्या गरजू पण होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येते. अशा पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सुभद्राबाई शिक्षण निधीतर्फे चिटणीस सुभाष कुळकर्णी यांनी केले आहे.

यासाठी जातिधर्माची बंधने नाहीत, तसेच विशिष्ट गुणांचीही अट नाही. तसेच गरजू शैक्षणिक संस्थांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत केली जाते. वर्ष २०२५-२६ करिता इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि संस्थांनी अर्ज पाठवावेत. अर्ज केवळ ऑन लाईन पध्दतीने निधीच्या संकेतस्थळाद्वारे दिनांक १५ जून २०२५ पासून स्वीकारण्यात येतील. प्रत्यक्ष कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. www.subhadrabaishikshannidhi.com या संकेतस्थळावरील माहितीपत्रक पहावे व त्याप्रमाणे कार्यवाही करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ आहे याची नोंद घ्यावी. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाऊ शकणार नाही. तरी गरजु विद्यार्थी व पालकांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन चिटणीस सुभाष कुळकर्णी यांनी केले आहे.