जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या देशभरातील नाममात्र विद्यार्थ्यांमध्ये रोटरी स्कूलच्या 15 विद्यार्थ्यांचा नामांकित आय. आय. टी. कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित.

खेड – (प्रतिनिधी)     नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात येणाऱ्या जे. ई. ई. परीक्षेसाठी भारतातून दरवर्षी 18 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसतात. त्यापैकी 18 हजार विद्यार्थी जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षा पात्र ठरत देशभरातील नामांकित आय. आय.टी महाविद्यालयातील प्रवेशास पात्र होतात. उल्लेखनीय बाब म्हणजे यावर्षी माहे मे मध्ये झालेल्या जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेमध्ये कोकणातील एकमेव रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलचे तब्बल 15 विद्यार्थी जे.ई.ई. ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. कु. ओम जैन याने कोकण विभागात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त करून रोटरी क्लब ऑफ खेडतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला.

 

जे. ई. ई प्रवेश परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. ओम जैन ( गुण 144 ) याने कोकण विभागात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तसेच कु. नील लिमये ( गुण 111 ), कु. केवल खापरे ( गुण 111 ), कु. अश्लेषा देवधर ( गुण 106 ), कु. साहिल अंगज ( गुण 105 ), कु. मानस राऊल ( गुण 105 ), कु. गौरव पाटील ( गुण 105 ), कु. सुयश नवरंग, कु. तेजस कुमार, कु. अन्वयी तांबे, कु. रोनक शेठ, कु. ऐनेश मालंडकर, कु. असित पवार, कु. सलमान तडवी व कु. हर्ष पवार या गुणवंत विद्यार्थ्यांनी जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होऊन आय. आय. टी. कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या रोटरी शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादित केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

*संपूर्ण देशभरातून जे. ई. ई. परीक्षेला प्रविष्ट होणारे विद्यार्थी व नामांकित आय. आय. टी. महाविद्यालयातील प्रवेशास पात्र होणारे विद्यार्थी यांची टक्केवारी पाहता कोकणातील एकमेव रोटरी स्कूलमधून जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 15 विद्यार्थ्यांची टक्केवारी ही गौरवास्पद आहे. वैशिष्ट्याची बाब म्हणजे जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेचा दरवर्षी उंचावत चाललेला निकाल देणारी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल ही संपूर्ण कोकणातील एकमेव शाळा ठरली आहे.*

 

जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना फिजिक्स विषय शिक्षक प्रा. राकेश स्वर्णकार, प्रा. कुलदीप गुप्ता, प्रा. प्रेमसागर सिंग, मॅथ्स् विषय शिक्षक प्रा. हुसेन मुबारक, प्रा. विशाल सिंग, प्रा. सुनिलकुमार भारती, केमिस्ट्री विषय शिक्षक प्रा. अचितानंद झा, प्रा. जतीन गुप्ता तसेच वर्गशिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.