भरणे ग्रामपंचायत सदस्य जगदाळे आज देणार राजीनामा

सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप, अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर

खेड(प्रतिनिधी)तालुक्यात राजकीयदृष्ट्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भरणे ग्रामपंचायतीतील शिवसेनेचे सदस्य महेश जगदाळे यांनी थेट राजीनाम्याचे अस्त्र उगारल्याने एकच खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष गोवळकर मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत कोणालाही विश्वासात घेत नसल्यामुळेच राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचे जगदाळे यांनी स्पष्ट केले. यामुळे अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

 

भरणे ग्रामपंचायतीला कचरा उचलण्यासाठी घंटागाडी प्राप्त झाली आहे. या घंटा गाडीचे सोमवारी

शिवसेनेचे उपनेते संजय यांच्या कदम प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. मात्र घंटागाडीचे लोकार्पण करताना सरपंच गोवळकर यांनी कुठल्याही सदस्याला विश्वासात न घेताच लोकार्पण सोहळा पार पाडल्याचा आरोप जगदाळे यांनी केला आहे. सरपंच गोवळकर है नेहमीच मनमानी कारभार करत असून या कारभाराला कंटाळूनच राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. ११ जून रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपुर्द करणार असल्याचेही जगदाळे यांनी सांगितले.