रत्नागिरी ः प्रतिनिधी : बेदरकारपणे ट्रक चालवून अपघात करत स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना रविवार 4 जून रोजी सकाळी 8 वा.जयगड ते निवळी जाणार्या रस्त्यावरील तरवळ येथे घडली आहे.
घिरेश रामदेव राय (38,रा.मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.रविवारी सकाळी घिरेश आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-08-एफपी-1988) मधून कोळसा भरुन जयगड ते लोटे असा जात होता.सकाळी 8 वा.सुमारास तो तरवळ येथील हॉटेल इंद्रधनु येथील वळणावर आला असता त्याचा ट्रवरील ताबा सूटला आणि ट्रकचा अपघात झाला.या अपघातात घिरेशच्या डोक्याला आणि हाताला गंभिर दुखापत झाली असून ट्रकचेही नुकसान झाले आहे.याप्रकरणी चालक घिरेश विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कलम 279,337,338 सह महाराष्ट्र मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.