गुहागर | प्रतिनिधी : गुहागर असगोली कुणबी समाज संघटना पुन्हा एकदा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एक वटली असून महायुतीच्या विजयासाठी नुकतीच कीर्तन वाडी समाज मंदिर भागडे विभाग सभागृहामध्ये सर्व कुणबी समाजातील मंडळाने विजयाची शपथ घेतली .
गुहागर असगोली कुणबी समाज संघटनेने गुहागर नगरपंचायतीच्या वेळी आपली ताकद दाखवत पालकमंत्री असलेले विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर नगरपंचायत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून खेचून आणून भास्कर जाधव यांना धूळ चारली होती आणि विद्यमान महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांना नगराध्यक्ष म्हणून सत्तेमध्ये बसवले होते. गुहागर नगरपंचायती एकूण जागांपैकी 17 जागांपैकी केवळ एका जागेवर नगर नगरसेवक म्हणून विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना समाधान मानावे लागले होते भास्कर जाधव बद्दल असलेली प्रचंड नाराजी यावेळी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून समाजांना व्यक्त केली होती भास्कर जाधव यांनी नेहमीच समाजाला कमी लेखनाचे काम केले त्यामुळेच ही नाराजी प्रचंड प्रमाणात वाढली होती गुहागर वाशी यांनी सुद्धा शहर विकास आघाडीला चांगले सहकार्य केले होते तर माजी आमदार विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी एकत्र गुहागर नगरपंचायत निवडणूक लढवून यशस्वीपणे निवडणूक जिंकली होती मात्र निवडणुकीनंतर काही प्रमाणात या शहर विकास आघाडीमध्ये नाराजीचा नाट्य सुद्धा पाहिला मिळाले परंतु आत्ता भास्कर जाधव यांना गुहागर नगरपंचायतीमध्ये मध्ये असलेले नाराजी मी टिकून राहील असे वाटत असताना पुन्हा एकदा समाज हा राजेश बेंडल यांच्यासाठी महायुतीसाठी एकवटला असून आता गुहागर नगरपंचायततून ज्या पद्धतीने आपण भास्कर जाधव यांना हद्दपार केले तसेच आता गुहागर विधानसभेमधून हद्दपार करणार असल्याचे सर्वांनी एकमुखी ठराव केला आणि समाजातील सर्व मंडळाने आता आपण महायुतीचे काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी समाजातील 22 मंडळ एकत्र पणे हा निर्णय करण्यात आला.
एकदा समाजाचा निर्णय ठरला की तो कायमचा असतो हे या समाजाचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे यामध्ये कोणीही कितीही जाऊन विचारांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तरी यात बदल होत नाही अनुभव भास्कर जाधव यांना नक्कीच आहे त्यामुळे या पुढील काळात गुहागर शहरांमध्ये कुणबी समाजाच्या मंडळांमध्ये जाऊन इतर कोणत्याही राजकारण्याने हस्तक्षेप करू नये असा इशारा या संघटनेने दिला आहे. यावेळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र भागडे सचिव विकास मालप. नितीन सांगळे दीपक सांगळे ज्येष्ठ कार्यकर्ते अर्जुन जांगळी. सदानंद घुमे. अशोक जांगळी. गजानन धावडे. सह सर्व मंडळातील प्रमुख पदाधिकारी आणि अध्यक्ष उपस्थित होते